दिलासादायक : जिल्ह्यात आज दिवसभरात ७२ कोरोना बाधित आढळले; १६३ जण कोरोनामुक्त !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ७२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १६३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दिवसभरात जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्हाभरातील आजची आकडेवारी.
जळगाव शहर-३, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ-५, अमळनेर-३, चोपडा-४, पाचोरा-६, भडगाव-०, धरणगाव-६, यावल-५, एरंडोल-२, जामनेर-८, रावेर-६, पारोळा-६, चाळीसगाव-११, मुक्ताईनगर-१, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ७२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आज जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्हाभरात आजपर्यंत १ लाख ४१ हजार ५९४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३७ हजार २०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित १ हजार ८२९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content