अमेय नगरकरचा सागरी विक्रम

जळगाव (प्रतिनिधी) स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तसेच एलिफंटा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया यांच्या निरीक्षणाखाली सागरी अंतर पोलीस जलतरण तलावाचा तसेच जळगाव जिल्हा हौशी जलतरण असोशिएनचा जलतरणपटू अमेय कमलेश नगरकर याने तब्बल १६ किलोमीटर दोन तास एकोणचाळीस मिनिट नऊ सेकंद पोहून आज यशस्वीरित्या सागरी विक्रम केला आहे.

सदरचे अंतर हे स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांचे निरीक्षक सुखविंदर सिंग मुंबई यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे रेवती नगरकर,रमेश सोनवणे हे उपस्थित होते. सकाळी ठीक दहा वाजून २८ मिनिटांनी एलिफंटा जेट्टी येथून अंगाला ग्रीस लावून अंतर पार करण्यास सुरुवात केली. तो दुपारी एक वाजून सात मिनिटांनी गेटवे ऑफ इंडिया येथे पोहचला. अंतर पार करत असताना त्याला सुबोध सुळे, कमलेश नगरकर, रमेश सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. अंतर पार करत असताना राष्ट्रीय खेळाडू आदित्य ओक ,आरिफ पिंजारी, लोकेश खाचणे अथर्व रायचंदे ,कुणाल चौधरी ,रिद्धी नगरकर यांनी त्याच्यासोबत जलतरण केले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक संतोष मतानी, माजी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन,जिल्हा संघटनेचे राजेंद्र ओक,फारुक शेख,किशोर नेवे,प्रा.डॉ.अनिता कोल्हे,नरेंद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content