कानळदा रोड येथे एका विधवा महिलेला शिवीगाळ व मारहाण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कानळदा रोड येथे एका विधवा महिलेला जुन्या वादातून शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, कानळदा रोडवरील सिध्दी विनायक पार्क येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय विधवा महिला घरकाम करून आपला उदरनिर्वाह करते. २६ डिसेंबर रोजी महिला दवाखान्यात जात असतांना रस्त्यावर संशयित आरोपी हरीदास परशूराम निंबाळकर (वय-४९) रा. सीटी कॉलनी कानळदा रोड याने अडवणूक केली. तु माझ्या विरोधात केलेली केस मागे घे असे बोलून  शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. आणि विधवा महिलेल्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाच्या किंमतीचे सोन्याची मंगलपोत तोडून नुकसान केले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र पाटील करीत आहे.

Protected Content