एमआयडीसीत दुचाकी अपघातात एक जण जखमी; अज्ञातावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी दालमिल कंपनीजवळ २६ डिसेंबररोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात दुचाकीधारकाने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, औद्योगीक वसाहत मधील लक्ष्मी दालमिल कंपनीजवळ २६ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता  (एमएच १९ बीडी ८३०८) वर दुचाकीधारक दत्तू पाटील बसले होते. त्यावेळी अज्ञात दुचाकीधारकाने आपल्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने दत्तू पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दत्तू पाटील हे जखमी झाले असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात होताचा अज्ञात दुचाकीधारक घटनास्थळाहून फरार झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

 

Protected Content