जळगावातील परिक्षा केंद्रात एम-सेट परिक्षेला १ हजार ४२० विद्यार्थ्यांची उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी ।  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे रविवारी जळगाव केंद्रावर ३६ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय चाचणी (एम-सेट) परीक्षा रविवारी घेण्यात आली. या परीक्षेसाठी ३ हजार ४२० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १ हजार ९८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर १ हजार ४४० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा ही जून महिन्यातच घेण्यात येणार होती. परंतु देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यापीठाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर २७ डिसेंबर रोजी जळगाव शहरातील आठ परिक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. पहिल्या सत्रातील पेपर सकाळी १० वाजता असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याच्या शरीराच्या तापमानाची नोंद घेत त्याला सॅनिटायझर दिल्यानंतर त्याला परीक्षा केंद्रात सोडले जात होते.

शहरातील आठ केंद्रांवर परीक्षा झाली. यात मूळजी जेठा महाविद्यालय, स्वामी विवकानंद भवन, केसीईचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, केसीईचे इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड रिसर्च सेंटर, के.सी.ई.चे अभियांत्रिकी महाविद्यालय, ऍड सिताराम (बबनभाऊ) आनंदरामजी बाहेती महाविद्यालय, पी.एन. लुंकड कन्या शाळा, ओरियन सीबीएसई स्कुल या ठिकाणी परीक्षा शांततेत पार पडली.

सेटच्या परीक्षेसाठी सुमारे ३ हजार ४२० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १ हजार ९८० विद्यार्थी उपस्थित होते. तर १ हजार ४४० विद्यार्थी गैरहजर होते. सहा महिने उशिराने परीक्षा झाल्याने विद्यार्थ्यांची अनुपस्थितीची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे परीक्षेला केवळ ५८ टक्के विद्यार्थी उपस्थित असल्याचे परीक्षाविभागाकडून कळविण्यात आले.

Protected Content