हॉटेल कमल पॅराडाईज समोर अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी; एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकावर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  । जळगाव शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या हॉटेल कमल पॅराडाईज समोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील रोडवर भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

उसमा कमलेश वेद (वय-५१) रा. नवी पेठ, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १७ मार्च रोजी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास भुसावळ रोडवरील हॉटेल कमल पॅराडाईज समोरून (एमएच १९ सीएल ५२२०) क्रमांकाच्या दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत कमलेश वेद हे देखील होते. त्यावेळी समोरुन एम एच 20 एच बी 36 78 क्रमांकाच्या मालट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी उसमा वेद यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालक मोहम्मद अजित मोहम्मद जमील रा. आधार ताल जबलपूर ( मध्यप्रदेश ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.

Protected Content