जळगाव प्रतिनिधी । केशव स्मृती सेवासंस्था समूह व जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात अविनाशी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी संघ सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भरत अमळकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या वतीने डॉ. सविता पानट यांनी तर संतोष गर्जे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल मत मांडले. पुखराज पगारिया यांनी मार्गदर्शन केले. गणेश पूर्णपात्री व जयश्री पूर्णपात्री, रजनीकांत कोठारी यांचाही गौरव केला. किरण सोहळे यांनी गीत सादर केले. डॉ. प्रताप जाधव यांनी गौरवपत्राचे वाचन केले. या वेळी केशव स्मृती सेवा समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, डॉ. प्रताप जाधव, नीलिमा पांडे, राधिका मुळे, सुचित्रा देशपांडे, कविता दीक्षित, मधुकर जाधव, सचिव रत्नाकर पाटील, पुंडलिक पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक जोशी पुढे म्हणाले की, डॉ. आचार्य दादा केवळ नावाने दादा नव्हते तर त्यांच्या नावातील दादापण वडीलकीचे होते. अविनाशी सेवा पुरस्कार प्राप्त साकार संस्थेने ३४० बाळांना मायेचे छत्र तर संतोष गर्जे यांनी ८५ मुलांचे संगोपन केले आहे.