जालना-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मराठयांना ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालना जिल्हयातील घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी येथे मराठा आंदोलकांनी एसटी बस पेटवल्याची घटना घडली आहे. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात महामंडळाची एसटी अंबडवरून आलेली बस सकाळी अज्ञात मराठा आंदोलकांनी जाळली. या घटनेनंतर अंबड तालूक्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
तीर्थपूरी मार्कट बंद करण्यात आले आहे आणि इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांचे सहकारी शैलेंद्र पवार यांना पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तीर्थपूरीत तणावाचे वातावरण आहे. जालना विभागातील एसटी सेवा रद्द करण्यात आलेली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत जालन्यात बस सेवा बंद असतील. या घटनेनंतर आगार व्यवस्थापकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काल रात्रीपासून अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.