गडकरी म्हणजे ‘स्पायडरमॅन’ ! : खासदाराने उधळली स्तुतीसुमने !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नितीन गडकरी यांच्या कार्यप्रणालीबाबत अनेकांनी जाहीरपणे त्यांचे कौतुक केले आहे. यातच आता भाजपच्या एका खासदाराने त्यांच्या कार्याचा अनोखा गौरव केला आहे.

भाजपा खासदार तापीर गाओ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक करताना त्यांना ‘स्पायडरमॅन’ म्हटलं आहे. नितीन गडकरींनी देशभरात रस्त्यांचं जाळं उभं केल्यामुळे ते स्पायडरमॅन असल्याचे गाओ महणाले. लोकसभेत २०२२-२३ साठी ‘रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदानाची मागणी’ या विषयावरील चर्चेत सहभागी होताना अरुणाचलचे खासदार असणारे तापीर गाओ म्हणाले की, मी नितीन गडकरींचं नाव बदलून स्पायडरमॅन ठेवलं आहे. स्पायडरमॅनच्या जाळ्याप्रमाणे नितीन गडकरी देशाच्या कानाकोपर्‍यात रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे टाकत आहेत. नितीन गडकरी आहेत तर शक्य आहे.

तापीर गाओ यांनी यावेळी सांगितलं की, केंद्रात नरेंद्र मोदी सरकार असताना देशातील संवेदनशील भागांमध्ये आणि खासकरुन भारत-चीन सीमेवर रस्त्याच्या बांधकामाने वेग घेतला आहे. दरम्यान, गाओ म्हणाले की, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर चीनजवळील सीमेवरही रस्त्याचं बांधकाम वेगाने सुरु आहे. मोदींच्या नेतृत्वात अरुणाचल प्रदेशातील मॅकमोहन लाइनवर दोन पदरी रस्ताही उभा राहत आहे. भारत-चीन सीमेवर असणार्‍या संवेदनशील परिसरांचा दौरा करण्यासाठी नितीन गडकरी यांनी एक समिती तयार केली आहे. रस्त्यांची स्थिती ठीक नसल्याने त्यांना यामध्ये जास्त वेळ लागत आहे. पण आता या सर्व ठिकाणी रस्त्यांचं बांधकाम सुरु आहे, अशी माहिता तापीर गाओ यांनी दिली.

Protected Content