कोरोनाच्या नव्या आवृत्तीबाबत पुन्हा तज्ज्ञांचा अलर्ट

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाची आपत्ती ओसरण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आले असले तरी याचा बीए.२ व्हेरियंट हा धोकेदायक ठरण्याची शक्यता असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

भारतासह जगभरात कोरोनाचा प्रसार होऊन दोन वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे  कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे अनेकदा ठिकठिकाणी लॉकडाऊन  करण्यात येत होतं आणि याचा फटका सामान्य नागरिकांना तसंच व्यावसायिकांना बसत होता. अशात गेल्या काही महिन्यांपासून भारतात कोरोना रुग्णांची संख्या बरीच घटली असल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, आता कोरोनाचा बीए.२ व्हेरिएंट  पुन्हा एकदा चिंता वाढवू शकतो, असा इशारा विशेषतज्ञांनी दिला आहे.

विश्‍वविख्यात  तज्ञ डॉ. अँथनी फाउची यांच्यानुसार बीए.२ व्हेरिएंट कोविड-१९ च्या ओमायक्रॉन स्वरूपाचा एक अत्यंत संसर्गजन्य उप-प्रकार आहे. या व्हेरिएंटमुळे लवकरच अमेरिकेमध्ये कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. अमेरिकेमध्ये नोंदवलेल्या नवीन प्रकरणांपैकी सुमारे ३० टक्के प्रकरणं या उपप्रकाराशी संबंधित आहेत.

फाउची यांनी सांगितलं की यात संसर्ग क्षमता वाढली आहे. मात्र जेव्हा तुम्ही या उपप्रकाराची प्रकरणं पाहता तेव्हा ती अधिक गंभीर स्वरूपाची दिसत नाहीत, ते म्हणाले, या व्हायरसमुळे प्रकृती गंभीर होऊ नये, यासाठी लस आणि बूस्टर डोस हे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. या उपप्रकारामुळे चीन आणि युरोपच्या काही भागात संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

 

 

Protected Content