पाचोरा, पारोळा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

parola pachora news

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील पारोळा, पाचोरा तालुक्यात आज दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी पावसाचा शिरकाव होता. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

 

पाचोरा तालुक्यातील सामनेर, लासगाव, नांद्रा या भागात ढगाच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर पाचोरा तालुक्यातील काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने परीसरात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

pachora parola news

यासह पारोळा तालुक्यातील काही परीसरात पावसाचा शिरकाव झाला होता. वादळी पासामुळे पारोळा रस्त्यावर मोठी झाडे देखील कोलमळून पडल्याने वाहनधारकांची कोंडी झाली. तर विद्यूत तारा रस्त्यावर तुटून पडले. दरम्यान अवकाळी होणाऱ्या पावसामुळे मोठ्या वृक्षाच्या झाडांना व पत्राचे शेड रब्बी पेरणी, कापूस पिकांना मोठा फटका बसणार आहे.

Protected Content