मु.जे. महाविद्यालयात छात्र सैनिकांचा सत्कार

MJ College ncc candidate

जळगाव प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) युनिट मधील ३ छात्र सैनिकांनी दरवर्षी दिल्ली येथे होणाऱ्या थळ सेना शिबिरात उत्तुंग यश मिळविले. या उत्तुंग यशाबद्दल के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडळे यांच्याहस्ते छात्र सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यात सिनिअर अंडर ऑफिसर मोहित सपकाळे (सुवर्ण पदक – ऑबस्टकल), ज्युनिअर अंडर ऑफिसर विजय पोस्टे (रजत पदक – हेल्थ अंड हाइजीन), आणि ज्युनिअर अंडर ऑफिसर दर्शना काकडे (रजत पदक – फायरिंग) यांचा सत्कार करण्यात आला.

शूटींग स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचाही केला सत्कार
सोबत राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या जी.व्ही. मावळणकर शूटिंग स्पर्धेत कॅडेट सृष्टी सचिन भावसार हिने आसनसोल (पश्चिम बंगाल) येथे झालेल्या इंटर डायरेक्तरेट शूटिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर जी.व्ही. मावळणकर स्पर्धेचे मुलींमधील सुवर्ण पदक मिळविले. तसेच याच स्पर्धा शृंखलेत कॅडेट रोहित माळी याने देखील मुलांमध्ये ०६ व्या क्रमांकावर राहून पुढील राष्ट्रीय शूटिंग स्पर्धांसाठी एन.सी.सी. तर्फे अजूनही शिबिरात यशस्वी वाटचाल सुरु ठेवली आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.एस.एन. भारंबे, एन.सी.सी.चे वरिष्ठ अधिकारी लेफ्ट. डॉ.बी.एन. केसुर, लेफ्ट. डॉ.योगेश बोरसे, सी.टी.ओ. गायत्री खडके उपस्थित होते. अध्यक्षांनी या सर्व यशस्वी छात्र सैनिकांशी चर्चा करून त्यांना लष्करातच अधिकारी होण्यासाठीचे मार्गदर्शन केले. अशीच यशस्वी वाटचाल पुढे चालू राहण्यासाठी एन.सी.सी. युनिटला शुभेच्छा दिल्या.

Protected Content