आदर्श : खामगावातील आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीला दिला आधार

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । खामगाव येथील काँग्रेस सचिव धनंजय देशमुख यांनी काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात छत्र हरवलेल्या प्रियंका नावाच्या मुलीला दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी स्वीकारली. या कार्याचे गावात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात अनेक परिवाराने आपले घरातले करते गमावून बसले आणि त्यातच ज्या घरात मुलांनी आपल्या मायेचे आई वडिलांचे छत्र गमले दुःख कोणीच समजू शकत नाही ,अशाच एका परिवारातील मुलीला एका पक्षाच्या कार्यकर्त्याने आपल्या नेत्याच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून तो सदर परिवाराला दत्तक घेतले. आपल्या पक्षाच्या नेत्याला खुश करण्याकरता त्याच्या वाढदिवशी बॅनर बाजी, फोटो बाजी, फटाके जाहिराती करत ‘त्या’ नेताला जाम खुश करण्याकरता चढाओढ असते. पण याला आता  कोरोनामध्ये आलेल्या अनुभवातून पक्षाचे कार्यकर्ते देखील नेत्यांचे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे न करता त्यावर होणारा खर्च हा आता आपल्या भागातील गरजूपर्यंत देण्याकरिता प्रयत्नात आहे. दरम्यान, असंच काही प्रियंका अमोल भाग्यवंत या मुलीचे कोरोना काळात आपल्या आईवडिलांचे छत्र गमावून बसली होती. याकरता बुलढाण्यातील खामगाव येथील काँग्रेस पक्षाचे सचिव धनंजय देशमुख यांनी  काँग्रेसचे  मंत्री  अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस असताना प्रियंका हिला दत्तक घेत तिला आर्थिक मदत सोबत संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी देखील स्वीकारत खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

कोरोणामुळे घरातील आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या परिवाराकरता अनेक घोषणा झाल्या, त्याबद्दल मदती करता सरकारकडून अनेक घोषणा करण्यात आला. पण अजूनही त्याबाबत समाधानकारक मदत  परिवारापर्यंत पोहोचल्या नाही. पण त्यात सरकारचा एक भाग असलेल्या मंत्र्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फुल ना फुलाची पाकळी त्या कार्यकर्त्यांनी देऊन नेत्यांवर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होणाऱ्या खर्चाला फाटा देत योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करण्याचा हा पायंडा कायम राहिल्यास नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा पॅटर्न बदललेला दिसेल असे म्हटल्यास वावग ठरणार नाही.प्रियंका सारखे अनेक जणांनी आपले आई-वडिलांचे छत्र या कोरोणा काळात गमावलेली आहे. पण त्यांना समाजातून अशाप्रकारे मायेची ऊब मिळाली तर काही प्रमाणात का होईना, त्यावर मायेचीफुंकर घातली सारखे होईल यात शंका नाही.असे मत कॉग्रेस प्रदेश सचिव धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले.

 

Protected Content