मलिकांचे खाते आव्हाड व टोपेंना मिळणार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनी लॉंड्रींग प्रकरणी अटकेत असलेले अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या खात्यांची जबाबदारी जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांना मिळण्याची शक्यता आहे.

२३ फेब्रुवारीपासून अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्याकडील खाती जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. या बदलांबाबत सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

मलिक यांच्याकडे असलेल्या खात्यांची कामे अडून राहू नये आणि सर्वसामान्यांची त्रास होऊ नये, या उद्देशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसने या खात्यांचा कारभार राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तर कौशल्य विकास विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपवण्यात यावी, असा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.

यासोबत नवाब मलिक पालकमंत्री असलेल्या परभणी आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांसाठीही नव्या पालकमंत्र्यांची नेमणूक केली जाणार असून परभणीसाठी धनंजय मुंडे तर गोंदियासाठी प्राजक्त तनपुरे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

Protected Content