हँडबॉल खेळाडूंना मंगेश चव्हाण क्रीडासाहित्य पुरवणार

handball players

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील युवा नेते मंगेश चव्हाण यांनी आज (दि.७) सकाळी येथील के.आर. कोतकर महाविद्यालयाच्या प्रांगणात तरुण खेळाडूंची भेट घेतली. यावेळी खेळाडूंशी संवाद साधताना ते म्हणाले की, “परिवर्तन घडवण्याची व नवे काहीतरी निर्माण करण्याची धमक तरुणांमध्येच आहे. तरुणांनी नव्या ध्येयाकडे झेपावण्यासाठी सदैव सज्ज असले पाहिजे. तरुणांच्या शक्तीवर व सर्जनशीलतेवर माझा विश्वास आहे. खेळ माणसाला प्रफुल्लित व उत्साहीत करत असतात. त्यासाठी तरुणांनी व्यसनाची संगत न करता खेळाची संगत करावी.”

 

या भेटीदरम्यान मैदानावर उपस्थित ‘स्टार हँडबॉल क्लब’च्या हँडबॉल खेळाडूंना हँडबॉलसाठी पुरेसे साहित्य उपलब्ध नसल्याची खंत खेळाडूंनी व्यक्त केली. त्यांना लागलीच पुढील आठवड्यात संपूर्ण साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंगेश चव्हाण यांनी दिली. तसेच त्यांचे मित्र प्रभाकर चौधरी यांनीही साहित्य खरेदीसाठी तत्काळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली.
या कार्यक्रम प्रसंगी प्रभाकर चौधरी, परेश पवार (NIS coach), कल्पेश चौधरी (State Medalist, Thane Police), प्रफुल्ल शेळके (International Player),
करण राजपूत (Sport Teacher), निलेश राजपूत (State Medalist), अभिजीत अहिरराव (Maharshtra Police) आदी खेळप्रेमी उपस्थित होते.

Protected Content