जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील एप्रिल – जुलै २०२२ या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ‘e- KYC प्रमाणीकरणा’ची प्रक्रिया बंधनकारक असून सदर ‘e- KYC प्रमाणीकरण’ दि ३१ मार्च अखेरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
जळगाव जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ फेब्रुवारी २०१९ पासून राबविण्यात येत आहे. शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील एप्रिल – जुलै २०२२ या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापुर्वी e- KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असुन सदर e- KYC प्रमाणीकरण दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर पर्यंत पुर्ण करणे आवश्यक आहे.
यासाठी पात्र लाभार्थी शेतकरी यांना e- KYC करण्यासाठी पुढीलप्रमाणे OTP किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) https;//pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner मधील e- KYC या टॅब व्दारे किंok पी.एम. किसान ॲपव्दारे OTP व्दारे लाभार्थीना स्वत: e- KYC प्रमाणीकरण मोफत करता येईल.
तसेच ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर e- KYC प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने e- KYC प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रु. १५/- मात्र निश्चित करण्यात आला आहे.
तरी जिल्हयातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर पर्यंत आपले e- KYC प्रमाणीकरण पुर्ण करण्यात यावे” असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.