कॅरम स्पर्धेत मुलींमध्ये फातेमा खनसा व मुलांमध्ये अबुजर  शेख विजयी

WhatsApp Image 2019 08 21 at 8.05.36 PM

WhatsApp Image 2019 08 21 at 8.05.36 PM

जळगाव, प्रतिनिधी | मनपा स्तरीय १७ वर्षाखालील कॅरम स्पर्धेत मुलींमध्ये एम.ए.आर.ॲगलो उर्दूची  फातेमा खनसा व मुलांमध्ये युनिक उर्दू हायस्कूलचा अबुजर  शेख विजयी झाले आहेत.

जिल्हा कॅरम संघटना व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षा आतील मनपा सत्तरीय कॅरम स्पर्धेचे औपचारीक उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वाकोडे व बि.डी धाडी यांच्या हस्ते कांताई सभागृह येथे करण्यात आले. नपा क्रीडा समन्वयक एम. एम .पाटील स्पर्धेचे आयोजक जैन स्पोर्टस अकॅडमीचे सय्यद मोहसिन, मोहम्मद फजल हे उपस्थित होते. स्पर्धेत एकूण ९० मुलामुलींनी भाग घेतला होता. समारंभ स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य क्रीडा समन्वयक फारुक शेख व जळगाव हौशी कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष शरीफखान, स्पर्धा आयोजक सय्यद मोहसिन, मुख्यपंच मोहम्मद फजल, शेख वसीम ,सय्यद जुबेर आयशा खोकावाला, योगेश धोंडगे व सर्व क्रिडा शिक्षक उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल मुले : : शेख अबुजर (युनिक उर्दू हायस्कूल), शेख साहिल (अँग्लो उर्दू हायस्कू), खान अम्मार (मिल्लत उर्दू हायस्कूल) , शेख शिबान कलीम ( मिल्लत उर्दू हायस्कूल) , शेख मोहम्मद शाहिद (मिल्लत उर्दू हायस्कूल), सुमीत विष्णु भोये (अनुभूती इंग्लिश स्कूल), अफ्फान खान (सेंट लॉरेन्स हायस्कूल)
,अरशद जाकीर पिंजारी (अंग्लो उर्दू हायस्कूल)

स्पर्धेचा निकाल मुली : खनसा फातेमा वहाब मलिक (अँग्लो उर्दू हायस्कूल), खुशी भगवान पाटील (अनुभूती इंग्लिश स्कूल), भावना शेखर खैरे (अनुभूती इंग्लिश स्कूल) ,निधी सुजित जाधव (सेंट लॉरेन्स हायस्कूल), सलोनी संजय सोनवणे (अनुभूती इंग्लिश स्कूल),. दिक्षिता संतोष चोपडा( सेंट लॉरेन्स हायस्कूल ) , ज्योत्सना अनिल जगताप (अनुभूती इंग्लिश स्कूल )फरहीन महेमूद देशमुख(इकरा उर्दू हायस्कूल)  या  विजयी झाल्या आहेत.

Protected Content