मंदाताई खडसे यांना दिलासा : भोसरी प्रकरणात अंतरीम जामीन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भोसरी येथील भूखंड व्यवहारातील कथित गैरव्यवहार प्रकरणात मंदाताई खडसे यांना न्यायालयाने अंतरीम जामीन दिला आहे.

आ. एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना त्यांच्या कुटुंबियांनी भोसरी येथील खरेदी केलेला भुखंड वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. यातून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर याची ईडीकडून चौकशी सुरू असून या प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे सुमारे दीड वर्षांपासून कारागृहात आहेत.

दरम्यान, या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून यात न्यायालयाने मंदाताई खडसे यांना एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर अंतरीम जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. या प्रकरणात एकनाथराव खडसे आणि मंदाताई खडसे यांची सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने चौकशी केली असून हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.

Protected Content