खडसेंसह तिघा नेत्यांचे फोन टॅप करतांना दिले ‘हे’ धक्कादायक कारण !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फडणवीस सरकारच्या काळात खासदार संजय राऊत, तेव्हाचे भाजपचे नेते एकनाथराव खडसे आणि कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्या फोन टॅपींग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अलीकडेच भाजप सरकारने तत्कालीन कालखंडात काही नेत्यांचे फोन टॅप केल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा तब्बल ६० दिवस तर एकनाथ खडसे यांचा ६७ दिवस फोन टॅप करण्यात आला होता. त्याननंतर आता या नेत्यांचे फोन समाजविघातक घटक नावाखाली टॅप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्थात, हे नेते समाज विघातक कृत्य करत असल्याने यांचे फोन टॅप करण्यात यावेत असा शेरा नोंदविण्यात आला होता. आज संजय राऊत यांनी या प्रकरणी भाष्य करत भाजपवर टीका केली होती.

या संदर्भात खासदार संजय राऊत म्हणाले की, सर्वांना ऍन्टी सोशल एलिमेंट्स सांगून, सर्व खोटं सांगत फोन टॅप करण्यात आले. कुणाला ड्रग्ज पेडलर, कुणाला गँगस्टर म्हटलं गेलं. आमच्यावर नजर ठेवली जात होती. नवं सरकार स्थापन करणअयाच्या संदर्भात आम्ही कोणासोबत बोलत आहोत हे त्यावेळी सुरू होतं. आमची प्रायव्हसी भंग झाली. एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा करतो. ते एका राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्याच्या प्रति प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी हे करत आहे. आता त्यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवत आहे. एकनाथ खडसे, मी स्वत:, नाना पटोले… आमचे फोन नंबर तेच आहेत. पण आमच्या नावासमोर जे नाव टाकली आहेत त्यात कुणी ड्रग्ज पेडलर, कुणी गुंडांची टोळी चालवत आहे अशा प्रकारची नावं टाकून फोन टॅप करण्याची परवानगी रश्मी शुक्ला यांनी मागितली होती.

संजय राऊत पुढे म्हणाले की, २०१९ मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना आमच्यावर पाळत ठेवली जात होती. तेव्हाच्या अधिकारी रश्मी शुक्ला या केंद्राच्या सेवेत होत्या. भाजपचे नेते रश्मी शुक्ला सारख्यांना पाठबळ देत आहे ते अत्यंत चुकीचं असल्याची टीका राऊत यांनी केली.

Protected Content