भोरगाव लेवा पंचायतीचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायतीतर्फे येथे सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

भोरगाव लेवा पंचायतीतर्फे शहरातील संतोषी माता सभागृहात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी कुटुंब नायक रमेश पाटील, माजी आमदार निळकंठ फालक, भुसावळ शाखेचे अध्यक्ष ऍड.प्रकाश पाटील, सचिव डॉ.बाळू पाटील, प्रोजेक्ट चेअरमन आरती चौधरी, सुहास चौधरी, महेश फालक, मंगला पाटील, शरद फेगडे, रघुनाथ चौधरी, डिगंबर महाजन, ललीत पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, ललित पाटील, डॉ.वर्षा कोळंबे, वैशाली भगत, नीला चौधरी, किरण चौधरी, अर्चना पाटील, सुनंदा चौधरी, शालिनी पाटील, विकास पाचपांडे, सुनीता पाचपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या सोहळ्यासाठी दीपक महाजन, प्राची राणे, महेश मधुकर चौधरी (खिरोदा), ललीत महाजन, सुधीर काशीनाथ चौधरी (अंजाळे), दिनेश राणे, वासू इंगळे, प्रमोद धनगर, मनोज जावळे, अरुण पाचपांडे यांनी सहकार्य केले. डॉ. प्रिया सरोदे (सावदा) यांनी १० जोडप्यांना भेटवस्तू दिल्या. विनीत हंबर्डीकर, उल्हास महाजन, नेहल लढे, दीपक चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.
या विवाह सोहळ्यात १० वर-वधूंचा विवाह पार पडला. यात संजय उमाकांत फेगडे-प्रियांका, भूषण निवृत्ती वारके-काजल गणेश फिरके, वैभव चंद्रकांत सरोदे-शिल्पा प्रल्हाद होले, सूरज सोपान बढे-वैष्णवी राजेंद्र सासले, नंदकिशोर फेगडे-ऐश्वर्या मनवाडे, रोषण कोल्हे-मोहिनी नेहते, देवेश पाटील-प्रियांका चौधरी, दीपक बढे-खुशबू, उमेश संतोष पाटील-चंद्रकला तानाजी लंके, उल्हास तुकाराम महाजन-सपना दिवाकर भोळे यांचा समावेश होता.

Protected Content