वीज वितरण कर्मचारी सहकारी पतसंस्थेची कार्यकारिणी जाहीर

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या पाचोरा तालुका महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, पाचोरा या पतसंस्थेचे पदाधिकारी निवड नुकतीच करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी तालुका निबंधक सहकारी संस्था तसेच निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठक संपन्न झाली. संघटनेचे परिमंडळ पतसंस्था नियंत्रण समितीचे प्रमुख जे. एन. बाविस्कर, चेअरमन ऑडिट कमिशन तथा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या प्रमुख मार्गदर्शन व संघटनेचे परिमंडळ सचिव विरेंद्रसिंग पाटील, सर्कल सचिव प्रकाश कोळी, उपसर्कल सेक्रेटरी प्रकाश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचीत पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.

यात संस्थेच्या चेअरमनपदी संदीप युवराज पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुलोचना पाटील, मानद सचिवपदी हाफिजोद्दीन सैफुद्दीन शेख या पदाधिकारी यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दत्ताजी देशमुख यांच्या प्रतिमेस प्रमुख पदाधिकारी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. संस्थेचे तत्कालीन व्हाईस चेअरमन आणि संघटनेचे एकनिष्ठ सभासद कै. रामदास दगडू ठोसर यांचे नुकतेच दु:खद निधन झाले त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. संघटनेचे परिमंडळ सचिव विरेंद्रसिंग पाटील यांनी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी यांना संघटनेचे ध्येय धोरणे व नेतृत्वाचे निर्देशानुसार पुढील वाटचालीसाठी व कार्यक्रमासाठी अत्यंत जागृत राहून अपेक्षित काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन नाशिक येथे दि. १०,ते १२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान नाशिक येथे होऊ घातले असून त्यामध्ये सहभागी होऊन आपला सक्रीय सहभाग नोंदवणे अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन केले.

जे. एन. बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त करतांना संघटनेने दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून कामकाज करणे क्रमप्राप्त असून नेतृत्वाला अपेक्षित असे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण सर्वांनी दक्ष राहावे असे आवाहन केले. बैठकीस उपस्थित संचालक मंडळ तसेच सभासद पदाधिकारी म्हणून उत्तम जगन्नाथ पाटील, एम. बी. देशमुख, संदीप पाटील, वाल्मीक पाटील, हाफिजोद्दीन शेख, सुलोचना पाटील, विद्या बागुल, ज्ञानेश्वर पाटील,जगदीश महाजन, अशोक बंडू सुरवाडे, रमेश रामचंद्र सुर्यवंशी संस्थेचे कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील यांची उपस्थिती होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content