जिल्ह्यात राबविले नाकाबंदी व कोम्बिंगऑपरेशन; जिल्हा पोलीस दलाची धडक कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील २१ जानेवारी रोजी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करण्यात आली होती. या कारवाईत पोलीसांनी एकुण १ हजार ६०० वाहनांसह लॉज, हॉटेल्स, ढाबे यांची तपासणी केली. तसेच बेशिस्त वाहनधारकांकडून १ लाख १४ हजार २०० रूपयांची दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मंगळवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशान्वये २१ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचानकपणे नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या काळात अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्यासह ४० पोलीस अधिकारी व २१५ पोलीस अंमलदार व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या कारवाईत १०७ हॉटेल, लॉज, ढाबे चेक करण्यात आले. शिवाय १ हजार ६०० वाहनाची तपासणी, १३२ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून १ लाख १४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, १२४ समन्स बजावण्यात आले तर ६५ बेलेबल तर ५३ नॉन बेलेबल वारंट बजावण्यात आले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मंगळवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार व कळविले आहे.

Protected Content