जानकीनगरात तरुणाला कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी एका जणाला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या रागातून जानकीनगरातील तरुणाला कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर अल्पवयीन संशयितालाही नोटीस बजावली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल आहे.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जानकीनगरातील रहिवासी गोपाल सोनवणे याचे त्याचा मित्र भुषण नावाच्या तरुणासोबत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात ठेवून शुक्रवारी ११ मार्च रोजी गोपाल याला अल्पवयीन मुलगा व दर्शन अभिमान चौधरी दोन्ही रा. गणेशवाडी तसेच कुणाल कोळी रा. जैनाबाद या तिघांनी घरात घुसुन बेदम मारहाण केली. यादरम्यान अल्पवयीन मुलाने कोयत्याने  गोपाल याच्या डोक्यावर मारला तर भांडण सोडविण्यास गोपालचे वडील गेले असता त्यांच्या डोक्यात वीट मारुन त्यांना गंभीर जखमी केले तसेच तक्रार केली तर जीवेठार मारण्याची  धमकी दिली होती. याप्रकरणी जखमीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध  एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील, सुधीर साळवे , योगेश पाटील यांच्या पथकाने संशयित दर्शन अभिमान चौधरी यास गणेश वाडी जळगाव येथून अटक केली. अल्पवयीन मुलालाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आलेला आहे. संशयितास तपासी अंमलदार पोहेकॉ योगेश सपकाळे यांनी न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे.

 

Protected Content