Home क्राईम नवीपेठेतून तरूणाची लांबविली दुचाकी

नवीपेठेतून तरूणाची लांबविली दुचाकी

0
61


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीपेठ परिसरातून तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जयराज प्रकाश पवार (वय-३०) रा. पोलीस कॉलनी जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार १२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जयराज पवार हा खासगी कामाच्या निमित्ताने (एमएच १९ सीडी २४१६) क्रमांकाच्या दुचाकीने शहरातील नवीपेठ येथील सुभाष को-ऑपरेटीव्ह बँकेच्या समोर आला. त्याठिकाणी दुचाकी पार्क करून कामाच्या निमित्ताने निघून गेला.  दुपारी २ वाजता काम आटोपून दुचाकीजवळ आला असता त्यांचा दुचाकी दिसून आली नाही.

दुचाकीचा परिसरात शोधाशोध केला परंतू मिळाली नसल्याने त्याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिवार १२ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईका राजकुमार चव्हाण करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound