Home Uncategorized भाजपाचे फडणवीस यांच्या समर्थनार्थ आंदोलन (व्हिडिओ)

भाजपाचे फडणवीस यांच्या समर्थनार्थ आंदोलन (व्हिडिओ)

0
41


जळगाव, , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीनंतर जळगावात टाॅवर चौकात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यात भाजपाच्या वतीने प्रतिकात्मक नोटीस जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त फडणवीस यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

 

भाजपाच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा जळगाव जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे , महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी व जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नोटिशीची होळी करून निषेध करण्यात आला. याप्रसंगी सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, अरविंद देशमुख, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, सुशील हासवणी, सचिव महेश चौधरी, राहुल वाघ, अक्षय चौधरी, धीरज वर्मा, प्रकाश पंडित, गणेश माळी, नगरसेवक आबा कापसे, अॅड. शुचिता हाडा, गायत्री राणे, सुरेखा तायडे, जितेंद्र मराठे, विजय पाटील, मनोज काळे, भरत कोळी, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, शक्ती महाजन, अजित राणे, शांताराम गावंडे, संजय तिरमाले, चेतन तिवारी, आघाडी अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, नितू परदेशी, अशोक राठी, रेखा पाटील, भूषण भोळे, प्रल्हाद सोनवणे, प्रभाकर तायडे, हेमंत जोशी, प्रमोद वाणी, अरुण श्रीखंडे, मंगेश जुनागडे, युवा मोर्चाचे जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, जयंत चव्हाण, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/638263690578088

 


Protected Content

Play sound