बळीरामपेठ परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरातील साडी सेंटरच्या दुकानासमोर एकाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. यासंदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. मधुसूदन पुरूषोत्तम साळुंखे (वय-५६) रा. दुध फेडरेशन, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करुन आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ते त्यांची मालकीची दुचाकी (एमएच १९ बीएफ ०८१२) ने कामाच्या निमित्ताने शहरातील बळीराम पेठ भागात श्री जी साडी सेंटर येथे आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी पार्किंग करून कामानिमित्त निघून गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची पार्किंगला लावलेली २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे लक्षात आले. यासंदर्भात त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून आली नाही. रविवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल धांडे करीत आहे.

Protected Content