Home क्राईम महिलेचा विनयभंग करून कुटुंबाला मारहाण

महिलेचा विनयभंग करून कुटुंबाला मारहाण

0
42

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दळवेल येथे किरकोळ कारणावरून महिलेच्या आई-वडिलांना मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील दळवेल येथे ३५ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. दरम्यान महिलेच्या मुलीने अंगणात पाणी फेकल्याच्या कारणावरून शेजारी राहणारे विठ्ठल सुखदेव पाटील व धनराज विठ्ठल पाटील यांनी महिलेसह तिचे आई-वडील यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर आवराआवर करण्यासाठी महिला गेले असता तिची देखील साडी ओढून विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच तिला लाथाबुक्क्यांनी देखील मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विठ्ठल सुखदेव पाटील आणि धनराज विठ्ठल पाटील दोन्ही रा. दळवेल ता.पारोळा यांच्याविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल शेख करीत आहे.

 


Protected Content

Play sound