Home क्राईम महावितरण कंपनीच्या विद्यूत तारांची चोरी

महावितरण कंपनीच्या विद्यूत तारांची चोरी

0
45

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रोझोदा शिवारातील शेतातून महावितरण कंपनीचे ६ हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे तार चोरी केल्याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील रोझोदा शिवारातील विजय रावजी नेहते यांच्या शेतात असलेल्या लोखंडी खांब्याजवळ महावितरण कंपनीचे ६ हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे ३० ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीला आले. यासंदर्भात महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ गोरख रामचंद्र बेलदार (वय 34 रा. सावदा ता. रावेर) यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक विनोद तडवी करीत आहे.

 


Protected Content

Play sound