फटाके फोडण्यावरून एकावर चाकूने वार

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावात फटाके फोडण्याच्या कारणावरून एकाला मारहाण करून धारदार वस्तूने जखमी करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, चरणसिंग मानसिंग पाटील, रा. हिवरखेडा ता. जामनेर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारी राहणारे अरविंद मोहनसिंग पाटील आणि वीरेंद्र अरविंद पाटील दोन्ही रा. हिवरखेडा ता. जामनेर हे राहतात. १ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता फटाके फोडण्याच्या कारणावरून चरणसिंग यांनी लांब मात्र फटाके फोडा असे सांगितले. याचा राग आल्याने अरविंद पाटील आणि वीरेंद्र पाटील या दोघांनी चरणसिंग पाटील यांना बेदम मारहाण केले. त्यानंतर एकाने हातातील धारदार वस्तूने डोक्यावर वार करून गंभीर करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमीअवस्थेत चरणसिंग पाटील यांना जामनेर उपग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या जबाबावरून पहूर पोलीस ठाण्यात अरविंद मोहनसिंग पाटील आणि वीरेंद्र अरविंद पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक हंसराज वाघ करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

Protected Content