महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत सिद्ध केले बहुमत

mahavikasaaghadi 209700 201911328139

मुंबई, वृत्तसंस्था | विधानसभेत आज (दि.३०) महाविकास आघाडीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव पास करून आपले बहुमत सिद्ध केले आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षांची निवड न करता प्रोटेम स्पीकरच्या माध्यमातून बहुमत सिद्ध करण्याचा अवैध प्रकार सरकारने केल्याचा आरोप करीत भाजपने आपल्या मित्रपक्षांसह या प्रक्रियेवर बहिष्कार टाकून सभागृहातून बाहेर जाणेच पसंत केले.

 

यावेळी प्रोटेम स्पीकर दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या मतविभागणीनुसार सरकारच्या बाजूने १६९ मते पडली तर एमआयएम व सी.पी एम. यांचे चार सदस्य तटस्थ राहिले. तसेच भाजपच्या १०५ सदस्यांसह त्यांचे मित्रपक्ष मिळून ११५ सदस्य यावेळी सदनातून बाहेर निघून गेले. बाहेर आल्यावर भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण मतदान प्रक्रियेबद्दल राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.

Protected Content