चोपडा महाविद्यालयातर्फे महावॉकेथाँन रॅली (व्हिडीओ)

chopada clg

 

चोपडा प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने रस्ते सुरक्षितता संदर्भात व्यापक जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी आज महावॉकेथाँन-२०१९ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच कँसी ग्लोबल, सीएसआर डायरी यासारख्या सामाजिक संघटनांनी पुरस्कृत केलेल्या रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत महावाकेथाँनचे आयोजन करण्याची संधी कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाला उपलब्ध करून दिली. या प्रसंगी रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्युंच्या बाबतीत भारत जगातील प्रथम क्रमांकाचे राष्ट्र असून २०१६ च्या आकडेवारी नुसार भारतात ४,७३,००० रस्ते अपघात होवून १,५१,५३७ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. दिवसेंदिवस रस्ते अपघात वाढत आहेत. त्याकरिता रस्ते सुरक्षितता संदर्भात व्यापक जनजागृती निर्माण होण्यासाठी या महावाकेथाँनचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले.

या मार्गाने रॅली
तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून महावाकेथाँन रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. रॅली महाविद्यालय परिसरातून सुरु होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, संत गाडगे महाराज चौक, थाळनेर दरवाजा, गोल मंदिर, मेनरोड मार्गाने पुन्हा महाविद्यालयात येवून रॅलीचा समारोप करण्यात आला.

मार्गदर्शन
समारोप प्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी स्वत:हून प्रामाणिक पणे रस्ते सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, तसेच समाजातील घटकांना देखील रस्ते सुरक्षितता व जबाबदारीने वाहन चालविण्यासाठी जनजागृती केली पाहिजे. हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालवतांना मोबाईलचा वापर करु नये अशा सूचना त्यांनी विद्यार्थ्याना दिल्या. याचबरोबर, प्राचार्य डॉ. सूर्यवंशी यांनी देखील विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षितता काळाची गरज याविषयी मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थितीत
महावाकेथाँनच्या शुभारंभ प्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश जी. पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, नगर परिषदचे मुख्याधिकारी अविनाश गोंगाडे, शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.ए.एल. चौधरी, डॉ.के.एन. सोनवणे, डॉ.व्ही.टी.पाटील, प्रा.एन.एस.कोल्हे, प्रा.बी.एस.हळपे, प्रा.व्ही.वाय.पाटील आणि डी.एम.पाटील उपस्थित होते. याचबरोबर, महावाकेथाँन रँलीत महाविद्यालयातील वरिष्ठ, कनिष्ठ, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या हजारो विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. डॉ. शैलेश वाघ यांनी महावाकेथाँन-२०१९ चे प्रास्ताविक केले.

यशस्वीतेसाठी यांनी केले प्रयत्न
महावाकेथाँन रँलीच्या यशस्वी आयोजनासाठी महावाकेथाँनचे समन्वयक डॉ.आर.आर.पाटील, सहसमन्वयक प्रा.मुकेश पाटील, प्रा.विशाल पाटील, प्रा.अभिजीत साळुंखे, प्रा.विवेकानंद शिंदे, प्रा.दिपक करंकाळ, प्रा.निव्रुत्ती पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी प्रयत्न केले.

Protected Content