जिल्ह्यात आज आढळला १ रूग्ण; तर २ रूग्ण बरे

जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात १ कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर २ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोना ओसरत असल्याचे आलेख मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

दिवसभरात जळगाव ग्रामीण येथे १ कोरोना बाधित रूग्ण आज आढळून आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५३२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९१रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या ५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content