किनगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचा सत्कार

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनीधी | तालुक्यातील किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुल येथे शनिवार दि.१० रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्ये व यश संपादन केल्याबद्दल गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

 

किनगाव येथील आयुष पाटीलने निट परिक्षेत उत्तम यश मिळवल्याबद्दल स्कुलच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच गिरडगाव येथील पोलीस पाटील व यावल तालुका पोलीस पाटील .संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांची जळगाव जिल्हा पोलिस पाटील संघटनेच्या कार्यध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व कोमल पाटील यांनी आय.आय.टी मँकेनीकल इंजीनीयर म्हणून उत्तम कार्य केल्याबद्दल त्यांचा देखील  सत्कार यावेळी करण्यात आला.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक व यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांचे वडील वसंतराव पाटील होते. तर सेवानिवृत्त शिक्षक पंडीत गुरूजी,एम. डी. पाटील, योगेश वसंत पाटील, रेखा योगेश पाटील, प्राचार्य अशोक पाटील, उप प्राचार्य राजश्री सुभाष अहीरराव व दै.देशदूतचे पत्रकार महेश पाटील इ.मान्यवर व्यासपीठावर उपस्थीत होते. यावेळी वसंतराव पाटील यांनी किनगाव इंग्लिश मेडीयम स्कुलच्या शिक्षण व संस्काराचे कौतुक केले तर आयुष पाटील यांनी आपला सत्कार केल्याबद्दल स्कूलचे आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  विजयकुमार पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगतात  आयुष पाटील सारखे यश मिळवावे असे आवाहन केले. यावेळी स्कुलचे शिक्षक शाळेचे शिक्षक प्राचार्य अशोक पाटील, उप प्राचार्य राजश्री अहिरराव, शिक्षक दिलीप  संगेले, हर्षल मोरे, योगीता बिहारी, देव्यानी सोळुंके, मिलींद भालेराव, भावना चोपडे, प्रतिभा धनगर, अनिल बारेला, पवनकुमार महाजन, संपत  पावरा, वैशाली धांडे, शाहरूख रशीद खान, प्रतिक तायडे, पुजा शिरोडे, तुषार धांडे, नूतन देशमुख, अनिता देशमुख, रामेश्वरी कांबळे, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन सुहास भालेराव यांनी केले तर आभार  गोपाल चित्ते यांनी मानले.

 

Protected Content