मुंबई शेअर बाजारात ९२० अकांची घसरण

share market

 

मुंबई प्रतिनिधी । शेअर बाजार आज उघडला त्यावेळी वातावरण चांगले होते. सकाळी व्यापाराची सुरुवात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) सेन्सेक्स २२८ अंकांच्या वाढीसह ३८ हजार ८९५ अंकांवर उघडला होता. मात्र, दुपारी २.२० मिनिटांपर्यंत सेन्सेक्समध्ये ९२० अकांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेअर बाजारात घसरण झाल्याने येस बँकेचे शेअर आतापर्यंत सर्वात खाली म्हणजे २९.०५ रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे याचे बाजार मूल्य ८ हजार कोटी रुपयांच्या खाली गेले आहे. दिवसभरात येस बँकेचे शेअर ३० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. आरबीएल बँकेचे शेअर २० टक्के कमी झाले. येस बँकेच्या मोठ्या स्तरावर इंडिया बुल्सला कर्ज देण्याच्या बातमीमुळे शेअर बाजारात घसरण होत आहे. परंतु, सीईओने या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. मार्केट कॅपच्या तुलनेत निफ्टी बँक सर्वात कमकुवत बँक बनली आहे. एका महिन्यात या शेअरमध्ये ३१ टक्के, एका तिमाहीत ६२ टक्के, ६ महिन्यात ८६ टक्के आणि एका वर्षात ७७ टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. काल सायंकाळी शेअर बाजारात रेकॉर्ड चौथी सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली होती.

आज सकाळी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चा निफ्टी व्यापाराची सुरूवात ही ११ हजार ५०० च्या खाली गेली. सार्वजनिक कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या शेअरमध्ये ७ टक्के वाढ झाल्याचे दिसले. सरकारने बीपीसीएलमधून आपली भागीदारी विकून टाकणार असल्याची चर्चा आहे. म्हणून मंगळवारी या शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स २३७ अंकांच्या उसळीसह ३८ हजार ९०५ अंकावर पोहोचला आहे. तर निफ्टी ७०.३० अंकाच्या वाढीसह ११ हजार ५४४ अंकांवर पोहोचला आहे. आज सकाळी १० वाजता बीपीसीएलचे शेअर ५ टक्के वाढून ते ४९४ रुपयांचा व्यापार करीत होते. ४६० च्या अंक वाढीनंतर २०३ अंकाची घसरण पाहायला मिळाली.

Protected Content