जळगावात तलवारीसह तरूण पोलीसांच्या ताब्यात

ssss

जळगाव, प्रतिनिधी | मेहरूण जलतरण तलावाजवळ हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरूणास एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरूण जलतरण तलावाजवळ तलवार घेऊन तरुण उभा असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना मिळाली. मिळालेल्या खबरीवरून पो.ना. नितीन पाटील, पो.कॉ. मुद्सर काझी, पो.कॉ. लुकमान तडवी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी जलतरण तलावाच्या समोर एक तरुण हातात तलवार घेऊन उभा असल्याचे दिसले. पोलिसांनी भूषण विलास सोनवणे (वय- १९, रा. राम नगर, शिरसोली नाका, जळगाव) याला तलवारीसह ताब्यात घेतले. याप्रकरणी सोमवार ३० सप्टेंबर रोजी रात्री उशिराने गुन्हा नोद करण्यात आला. पुढील तपास नितीन पाटील करीत आहेत.

Protected Content