ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीने शिफारस केल्यावरून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. यात स्वच्छता मोहिमेसह रक्तदान शिबीर, वृक्षारोपणासारखे उपक्रम राबविण्यात आले आहे. राज्यच नव्हे तर देशभरात त्यांना मानणारा मोठा शिष्य परिवार आहे.

Protected Content