सन्मानामुळे समाजाला कामासाठी ऊर्जा मिळते – माजी आ. अरूण पाटील

रावेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी त्यांच्यापर्यंत पायाभूत सुविधा पोहचणे गरजेचे आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा केला जाणारा गौरव ऊर्जा निर्माण करणारा आहे असे मत माजी आमदार अरुण पाटील यांनी व्यक्त केले.

कृषीसेवतर्फे तर्फे वर्धापन दिनानिमित्त रावेर येथील शेणाबाई गोंडू पंडित मराठा मंगल कार्यालयात आयोजित पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन पुणे येथील महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुलनाना माने पाटील यांच्या हस्ते नांगर पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ उल्हास पाटील, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यपक महामंडळाचे अध्यक्ष जे के पाटील, कृषीसेवकचे संपादक कृष्णा पाटील, जळगाव जिल्हा ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ केतकी पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, माजी जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, तहसीलदार उषाराणी देवगुणे, उद्योजक श्रीराम पाटील, डॉ प्रशांत सरोदे, युगंधर पवार, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, पद्माकर महाजन, माउली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ संदीप पाटील ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे, रावेर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, केळी कामगार नेते दिलीप कांबळे, जळगाव ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीईओ प्रा सी एस पाटील, भरती ज्वेलर्सच्या संचालिका भारती गणवाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्यातील शेती व शेतीशी निगडित क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ४५ व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच पुरस्कारार्थींच्या कार्याचा परिचय असलेल्या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

माजी आमदार पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले कि, समाजात अनेक जण स्वकर्तुत्वाने प्रगती करीत आहेत. कृषीसवेकतर्फे त्यांचा होणारा सन्मान इतरांना प्रेरणा देणारा आहे. शेतीमध्ये सरकारने पायाभूत सुविधा निर्माण केल्यास शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. त्यासाठी प्रक्रिया उद्योग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुलनाना माने पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कृषीसवेकच्या वाटचालीचा आढावा संपादक कृष्णा पाटील यांनी मांडला. सुत्रसंचलन व आभार ज्योती राणे यांनी मानले.

पुरस्कार प्रेरणा देतात : डॉ पाटील
कृषीसेवकतर्फे शेतकऱ्यांचा होणार सन्मान समाजाला प्रेरणा देणारा आहे. शेती क्षेत्रातील नावीन्य शोधून ते समाजासमोर मांडण्याची कृषीसेवकची भूमिका योग्य आहे. शेतीच्या विकासासाठी शासनाने अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

शेतकऱ्यांनी सक्षम व्हावे : आमदार चौधरी
शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. मात्र वेळोवेळी त्याप्रमाणात शासनाकडून पाहिजे तेवढी मदत मिळत नाही. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी सक्षम होणे गरजेचे आहे. यशस्वी शेतकऱ्यांचा तसेच या क्षेत्रातील व्यक्तींचा कृषीसेवकने केलेला सन्मान मार्गदर्शक आहे असे मत आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले.

Protected Content