सावदा येथे दुचाकी चोरतांना चोरटा सीसीटीव्हीत कैद

सावदा प्रतिनिधी । सावदा येथील प्लॉट एरिया भागातून २६ मे रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. दुचाकीची चोरी करतांना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी सावदा पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

सविस्तर महिती अशी की, शहरातील प्लॉट भागातील रहिवाशी चिराग मधुकर नेमाडे हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्याकडे त्यांच्या मालकीची (एमएची १९ बीडब्ल्यू ८९३८) क्रमांकाची दुचाकी आहे. २६ मे रोजी नेमाडे यांनी दुचाकी घरासमोर पार्किंगला लावलेली होती. २७ मे रोजीच्या पहाटे २.५२ वाजेच्या सुमारास ३० ते ३५ वयोगटातील चोरटा पायी आला. त्यानंतर लालरंगाची दुचाकी ढकलत नेत पुढे जावून दुचाकी घेवून पसार झाला. अवघ्या १ मिनीटाच्या आत त्याने ही दुचाकी लांबविली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दुचाकी चोरी झाल्याचे आज सकाळी उघडकीला आला आहे. यासंदर्भात नेमाडे यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Protected Content