उपसभापती धनश्री सावळेंच्या प्रयत्नांनी तीन गावांना व्यायाम शाळा मंजूर

 

रावेर प्रतिनिधी ।  पंचायत समितीच्या उपसभापती धनश्री सावळे यांच्या प्रयत्नाने के-हाळा पंचायत समिती गणात तीन गावांना व्यायाम शाळा मंजूर केल्याने युवकांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

रावेर पंचायत समितीच्या उपसभापती धनश्री संदीप सावळे यांच्या प्रयत्नाने अहिरवाडी, मंगरूळ, के-हाळा बु या गावांना व्यायामशाळा मंजूर झाल्या आहेत.  उपसभापती धनश्री  सावळे यांच्या नेहमीच्या व सततच्या पाठपुराव्यामुळे व्यायामशाळा प्रत्येक गावाला मंजूर झाली आहे. यात अहिरवाडीसाठी सात लाख रुपये मंगरूळसाठी  सात लाख रुपये मंजूर झाले आहे. तर के-हाळा बुद्रुक येथील व्यायाम शाळेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. के-हाळा बुद्रुक येथे साहित्यासाठी देखिल निधी मंजूर होणार असल्याचे उपसभापती धनश्री सावळे यांनी सांगितले.

Protected Content