शरद महाजन यांचे दातृत्व; कोविड सेंटरसाठी दिल्या दोन इमारती

यावल प्रतिनिधी । एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येने प्रशासनावरील तणाव वाढला असतांना दुसरीकडे काही संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. यात माजी जि.प. सदस्य शरद महाजन यांनी कोविड केअर सेंटरसाठी दोन इमारती उपलब्ध करून दिल्या असून यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री कै.जे.टी.महाजन यांचे सुपुत्र माजी जि.प.सदस्य शरद महाजन यांनी मदतीचा भाव जपला आहे. त्यांनी जे.टी.महाजन महाजन अभियांत्रिकीच्या दोन वसतीगृहाच्या इमारती कोविड केअर सेंटरसाठी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. शासनाकडून केवळ या इमारतींचे वीज बिल अदा केले जाते. यामुळे परिसरातील कोविड रूग्णांना आपल्याच भागात उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.

फैजपूर शहरात न्हावी व आमोदा रस्त्यावरील जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मुलांचे वसतिगृह नजरेस पडले. येथे २०० खाटांची व्यवस्था आहे. संस्थाध्यक्ष शरद महाजन यांच्याकडे तात्कालिन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी विचारणा केली. त्यानुसार महाजन यांनी होकार देत आमोदा रस्त्यावरील ज्ञानेश्‍वर वसतिगृह व न्हावी रस्त्यावरील सातपुडा वसतिगृह कोविड केअर सेंटरसाठी मोफत दिल्या आहेत.

शरद महाजन यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी प्रशासनाच्या मदतीला धाव घेऊन केलेली ही मदत अतिशय कौतुकास्पद असून इतरांनी याचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. यामुळे परिसरातून त्यांच्या दातृत्वाबाबत कौतुक करण्यात येत आहे.

Protected Content