भगिनी मंडळातर्फे ‘पर्यावरण रॅली’ उत्साहात

eco rally

चोपडा प्रतिनिधी । येथील भगिनी मंडळ, आणि शैक्षणिक संस्था महाराष्ट्र शासन व्दारे “महा महावॉकेथाँन पर्यावरण जनजागृती” भव्य रॅली आज शहरात काढण्यात आली.

याप्रसंगी भगिनी मंडळातील सर्व विभागाचे प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, ललित कला केंद्र, आयटीआय, किमान कौशल्य, समाजकार्य महाविद्यालय, नर्सिंग स्कुल या सर्व शैक्षणिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिंनी तसेच सर्व शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, लिपिक व सेवक बंधूंनी सहभाग घेतला होता.  तसेच ही रॅली जवळपास 800 ते 1000 च्या संख्येने भगिनी मंडळातून थाळनेर दरवाजा, गांधी चौक, तहसील कार्यालयाकडून गोल मंदिर, गुजराती गल्ली, डॉक्टर हेडगेवार चौक तसेच पुन्हा भगिनी मंडळात परतली. संस्थेच्या अध्यक्षा माननीय पुनम गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी आणि इतर पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.

“पर्यावरण वाचवा – झाडे लावा – झाडे वाचवा – पाणी वाचवा” अशा मौल्यवान विषयांवरील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांची पोस्टर्स लक्षवेधी ठरवून मोलाचा संदेश जनतेपर्यंत पोचविण्यात मदत झाली. सर्व स्तरावरून या रॅलीचे कौतूक होत आहे.

Protected Content