छत्रपतींचे नाव घेणे हा गुन्हा असेल तर मी तो पुन्हा पुन्हा करायला तयार : मुख्यमंत्री

 

udhav

 

मुंबई (वृत्तसंस्था) मी छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांची पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक जन्मात शपथ घेईन. जो आपल्या दैवताला मानत नाही, आई-वडिलांना मानत नाही तो जगायच्या लायकीच नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपाने सभागृहात मांडलेल्या आक्षेपाच्या मुद्द्यांवर त्यांना चांगलेच फटकारले.

 

छत्रपतींचे नाव घेणे हा गुन्हा असेल तर मी तो पुन्हा पुन्हा करायला तयार आहे. जो आपले दैवत, आईवडिलांना मानत नाही तो जगायला नालायक आहे. ज्यांची शपथ घेऊन हा कारभार आपण सुरू करत आहोत त्यांची मान उंचावेल असेच काम आम्ही करू, अशी ग्वाही देत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात विरोधकांवर टीका केली. ज्या महापुरुषांची शपथ घेऊन हा कारभार आपण सुरू करत आहोत त्यांची मान उंचावेल असेच काम आम्ही करू, अशी ग्वाही देत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात विरोधकांना फटकारले.

 

मी मैदानातला माणूस असून सभागृहात कसे होईल याची मला चिंता होती. पण इथे आल्यावर कळले मैदानातच चांगले असते, अशा शब्दांत सभागृहात भाजपाने घातलेल्या गोंधळावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीका केली. मी समोरा-समोर लढणारा आहे शत्रूला अंगावर घेणार आहे, असेही ते पुढे म्हणाले. उद्धव ठाकरे आणि अन्य सहा आमदारांनी घेतलेल्या मंत्रिपदाच्या शपथेसंदर्भात विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. याच मुद्द्यावरून आजच्या विशेष अधिवेशनात भाजपने गदारोळ घातला.

 

Protected Content