जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जळगाव जिल्हा समितीची मासिक बैठक रविवार ११ मे रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हाध्यक्षा चित्रा महाजन यांच्या निवासस्थानी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
बैठकीत नूतन कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले, तसेच आशियाई योगासन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या डॉ. सौ. शरयू विसपुते यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ओंकार आणि महामुनी पतंजली यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून झाली. त्यानंतर त्रिवार ओंकार आणि गुरुवंदना घेण्यात आली.बैठकीतील प्रमुख आकर्षण ठरले डॉ.शरयू विसपुते यांचा सत्कार. त्यांनी नुकत्याच झालेल्या आशियाई योगासन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून जळगाव जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. कार्यकारिणीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीत महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या २०२५-२६ या वर्षासाठी निवडलेल्या नवीन कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख सुनील गुरव, महाराष्ट्र योगशिक्षण समिती प्रमुख प्रा. डॉ. देवानंदन सोनार आणि जिल्हाध्यक्षा चित्रा महाजन यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र सोहळा पार पडला.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी उपस्थित योगशिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सचिव अर्चना गुरव यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्षा चित्रा महाजन यांनी केले. बैठकीच्या अखेरीस उपस्थितांनी एकत्रित फोटोसेशन केले
विशेष म्हणजे, या बैठकीसाठी वरणगाव आणि भुसावळ येथील तालुका पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र, जळगाव शहरातून केवळ २४ योगशिक्षकांनी उपस्थिती दर्शविल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली आणि पुढील कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पांडुरंग सोनार यांनी केले. शेवटी, सर्वांनी स्वादिष्ट पेयाचा आस्वाद घेतल्यानंतर बैठकीची सांगता झाली. संपूर्ण बैठक उत्साही आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.