महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा १८ मे पासून सुरू होणार

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेच्या उन्हाळी सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा 18 मे 2024 पासून सुरू होणार आहे. राज्यातील एकूण 39 परीक्षा केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षा 03 जून 2024 पर्यंत घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली. परीक्षेबाबतची अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Protected Content