छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजनगरातील तरुणांनी केले अभिवादन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील तरुण मित्रांच्या वतीने शत्रु देखील मरतांना ज्यांच कौत्तुक करून गेला असे धर्मवीर छत्रपती स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती यावल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन डॉ. हेमंत येवले यांच्या हस्ते पुजन करुन जयजयकार करण्यात आला.
स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी चालून येणाऱ्या औरंगजेबाशी छत्रपती संभाजी महाराजानी अखेर पर्यंत लढा देत स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळली लोककल्याणकारी योजनांद्वारे प्रजेचे हित जोपासले. अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे बुद्धी आणि शोर्याचा अदभूत संगम असणाऱ्या एकही युद्ध नहरणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रा मुकेश येवले यांनी प्रकाशझोत टाकला. या प्रसंगी निलेश बेलदार, अनिकेत येवले, किशोर यादव, बापू जासुद, हर्षल यादव, रामू यादव, अक्षित जासूद, अजय येवले, विक्की येवले, दर्शन येवले, देवेश चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव, छगन डुबले, हिमानशु कदम, समर्थ येवले व इतर उपस्थितांनी धर्मविर छत्रपती संभाजी महराजांचा जयघोष करुन नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आले.

Protected Content