…तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज लागणार नाही : राज ठाकरे

ठाणे (वृत्तसंस्था) आरक्षण देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नसताना त्यांनी आरक्षणाची घोषणा करून मराठा समाजाची दिशाभूल केली आहे, अशी टीक करतानाच महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य दिल्यास महाराष्ट्रात आरक्षण देण्याची गरजच पडणार नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

आरक्षण कोणत्या गोष्टींसाठी हवे आहे. शाळा-कॉलेज प्रवेश आणि नोकरीसाठीच ना, मग खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाहीच आहे. ८५ ते ९० टक्के उद्योग खासगी आहेत. मग कुठे नोकऱ्या देणार आहात असा सवाल उपस्थित करताना त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा सगळ्यांनी मान्य केले होते, मग अडले कुठे?, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मराठा आरक्षण मिळाल्यावर पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. दुष्काळावरूनही राज ठाकरेंनी सरकारवर तोफ डागली आहे. दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केलं ते सांगावं. दुष्काळाची कामे केली तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला, असे प्रश्न उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.

Add Comment

Protected Content