महाराणा प्रताप जयंती मिरवणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी धरला ताल ( व्हिडीओ )

maharana pratap jayanti chalisgaon

चाळीसगाव प्रतिनिधी । येथे वीर शिरोमणी मेवाड अधिपती महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांनी ताल धरला.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव वीर शिरोमणी मेवाड अधिपती नरव्याघ्र महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्ताने चाळीसगाव शहरात जल्लोषपूर्ण मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्वपक्षीय नेत्यांसह राजपूत समाजातील मान्यवरांसह तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. रेल्वे स्टेशन जवळ सायंकाळी सहा वाजता महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार राजीवदादा देशमुख, नगराध्यक्षा सौ आशालता चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक मंगेश चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, नगरपालिकेचे गटनेते संजय पाटील, उद्योगपती नारायण अग्रवाल, शिवाजी आप्पा राजपूत, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, डॉ. सुनील राजपूत, कैलास सूर्यवंशी, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. सुनील राजपूत यांनी महाराणा प्रताप यांचे महात्म्य व पराक्रम सांगणारे मनोगत व्यक्त केल्यानंतर मिरवणूक सुरू झाली. यात तरुणांसह सर्वपक्षीय नेत्यांनी ढोल ताशाच्या तालावर नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला यावेळी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, माजी नगरसेवक मंगेश राजपूत, सोमसिंग राजपूत, निलेश राजपूत, नगरसेवक बाप्पू अहिरे, चंदू तायडे, नगरसेविका सविता राजपूत युगंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्ष सौ स्मिता बच्छाव, हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्रा राजपूत दिव्यांगांसाठी काम करणार्‍या मीनाक्षीताई निकम, जिजाऊ जयंती समितीचे अध्यक्ष सोनल साळुंखे, पंचायत समिती उपसभापती संजय पाटील, नानासाहेब पवार आधी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. श्रीकांत राजपूत यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभयसिंह राजपूत, टोनू राजपूत, पप्पू राजपूत, विशाल राजपूत, प्रेमसिंग राजपूत, राहुल राजपूत, दीपक राजपूत, प्रवीण राजपूत, रवींद्र राजपूत, लखन राजपूत, महेंद्र राजपूत, नयन राजपूत, किशोर राजपूत यांच्यासह समाजातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. रेल्वे स्टेशन पासून निघालेल्या मिरवणुकीची सांगता महाराणा प्रताप चौक पाटील वाडा येथे झाली.

पहा : जयंती मिरवणुकीचा व्हिडीओ.

Protected Content