LIVE : राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरु !

congress

 

मुंबई (वृत्तसंस्था) आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा आज सकाळी ११ वाजता विस्तार होत आहे. या विस्तारात १३ नवे चेहरे फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याचे कळते. यात भाजपचे १०, शिवसेनेचे २ तर रिपाइंचा एक मंत्री असण्याची शक्यता आहे.

 

या मंत्रिमंडळात नव्या 12 मंत्र्यांचा समावेश होणार आहे. तर दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह राजकुमार बडोले आणि दिलीप कांबळे यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, आशिष शेलार, योगेश सागर, अनिल बोंडे, संजय कुटे, बाळा भेगडे, परिणय फुके, अतुल सावे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर, शिवसेनेकडून नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे.

या नेत्यांना मिळणार मंत्रिपद
1. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) संभावित कॅबिनेट
2. डॉ. संजय कुटे (भाजप) संभावित राज्यमंत्री
3. सुरेश खाडे (भाजप) संभावित कॅबिनेट
4. योगेश सागर (भाजप) संभावित राज्यमंत्री
5. डॉ. अनिल बोंडे (भाजप) संभावित राज्यमंत्री
6. अतुल सावे (भाजप) संभावित राज्यमंत्री
7. जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) संभावित कॅबिनेट
8. आशिष शेलार (भाजप) संभावित कॅबिनेट
9. तानाजी सावंत (शिवसेना) संभावित राज्यमंत्री
10. परिणय फुके (भाजप) संभावित राज्यमंत्री
11. अविनाश महातेकर (रिपाइं) संभावित राज्यमंत्री
12. बाळा भेगडे (भाजप) संभावित राज्यमंत्री

 

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/443864496405913/

Protected Content