भारत-पाक सामन्यासह संभाव्य पावसावर देखील कोट्यावधीचा सट्टा

Buy tickets 1

 

मँचेस्टर (वृत्तसंस्था) वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होत असून या लढतीवर पावसाचे सावट असल्याने सगळ्यांच्याच मनात धाकधूक आहे. हवामान विभागाने आज येथे पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सामना होणार का?, झाला तर किती षटकांचा होणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला असून भारत-पाक सामन्या सोबत पावसावर देखील करोडो रुपयाचा सट्टा लागलेला आहे.

 

लहरी पावसामुळे अस्वस्थ असलेल्या बुकींनी रविवारी भारत-पाक सामन्याचे भवितव्य अवलंबून असलेल्या पावसावरच सट्टा लावण्यास सुरुवात केली आहे. पावसाचा व्यत्यय न येता सामना पूर्ण खेळल्यास २० पैसे आणि पावसाचा व्यत्यय येऊन सामना रद्द झाल्यास पाच रुपये असा भाव शनिवारी सट्टाबाजारात खुला झाला. ब्रिटनमध्ये विश्वचषक सुरू असून पावसामुळे भारत-न्यूझीलंडसह अन्य सामनेही रद्द झाले. सट्टाबाजाराने हा सामना होईल, असा अंदाज वर्तवून बेटिंग घेण्यास सुरुवात केली आहे.

 

शनिवारी मँचेस्टरमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सध्यातरी मैदानावरील खेळपट्टी झाकण्यात आलेली आहे. आज येथे हलक्या सरी आल्या पण नंतर पाऊस पूर्णपणे थांबल्याने येथे दाखल झालेले चाहते काहीसे सुखावले आहेत. दरम्यान, वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ४ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यात भारताचाही न्यूझीलंडविरुद्धचा सामना आहे.

Protected Content