Home Cities पाचोरा गणेश शिंदे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

गणेश शिंदे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

0
139
ganesh shinde pachora

ganesh shinde pachora

भुसावळ प्रतिनिधी । लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे पाचोरा येथील प्रतिनिधी गणेश शिंदे यांना संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशनतर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुक्ताईनगर संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशनतर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी गणेश शिंदे यांना प्रदान केला. खान्देशी केसांवर फुगे या गाजलेल्या गाण्याचे दिर्गदर्शक अभिनेते सचिन कुमावत, गायक-अभिनेते अण्णाभाऊ सुरवाडे व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुक्ताईनगर येथील संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशन ही सामाजिक संस्था विविध उपक्रम राबविण्यासाठी ख्यात आहे. या संस्थेतर्फे सामाजिक राजकीय व्यवसायिक शैक्षणीक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयातील सभागृहामध्ये याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष छबिलदास पाटील यांच्यासह पदाधिकरी व सदस्य उपस्थित होते.


Protected Content

Play sound